मेहकर शहरातील आठवडी बाजार परिसरात तीन संशयित लोक शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती २७ जुलै रोजी मेहकर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी कारवाई केली. आठवडी बाजार परिसरात तालुक्यातील बरटाळा येथील रहिवासी जेरू परात्या भोसले (२०), राहुल श्रीरंग पवार (२०) व अमोल भोसले हे संशयितरीत्या फिरत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस गेले असता झटापटीत अमोल परात्या भोसले घटनास्थळावरून फरार झाला. पाठलाग करूनही तो हाती लागला नाही. दरम्यान, उर्वरित दोघांकडून ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व एक चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज रबडे करीत आहेत.
मेहकर शहरातून पिस्तुलासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:34 AM