लोकमत न्यूज नेटवर्कधाड (बुलडाणा): जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ला उघडकीस आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथील नंदकिशोर जाधव यांना दोन मुले नामे अभय (वय ११) व गौरव (वय ७) हे गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. अभय हा ४ थ्या वर्गात तर गौरव दुसºया वर्गात शिकत होते. दिवाळीच्या सुट्या असल्याने दोन्ही मुले गावाजवळीलच आपल्या गट नं.६४ मधील शेतात खेळण्यासाठी जात होती. दरम्यान २८ आॅक्टोबर रोजीसुध्दा दोन्ही मुले शेतात गेली परंतु रात्री उशीरापर्यंत परत न आल्याने घरच्यांनी दोन्ही मुलांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान रात्री १० च्या सुमारास नंदकिशोर जाधव यांच्या गट नं.६४ मधील शेतातील विहिरीत मोठा मुलगा अभयचा मृतदेह तरंगतांना नागरिकांना आढळला. तर गौरवचा पत्ता लागत नसल्याचे पाहून तब्बल चार विद्युत पंपांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यात आल्यावर गाळात गौरवचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी धाड पोलिसांनी मर्ग दाखल केला असून उत्तरीय तपासणी बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आल्यानंतर शव नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले आहे. पुढील तपास धाड पोलिस करीत आहे. २९ आॅक्टोबर रोजी त्यांच्यावर पांगरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 7:51 PM
धाड (बुलडाणा): जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ला उघडकीस आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली.
ठळक मुद्देपांगरखेड येथील घटनासख्या भावांच्या मृत्यूमुळे गावात पसरली शोककळा