जळगाव जामोद : वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी जळगाव जामोद शिवारात घडली. यातील जखमी मुलांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. जळगाव जामोद येथील सिद्धार्थ नगर भागातील आर्यन बांगर (वय १२) व अजय गोधळे ( वय १५) हे दोघे शेतामध्ये गेले होते. दरम्यान विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यामुळे ते झाडाखाली उभे राहिले. झाडावर वीज पडल्याने दोन्ही मुले जखमी झाले. भाजलेल्या अवस्थेत नागरिकांनी त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. दोघेही 60 टक्के जळाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णवाहिका नादुरुस्त येथील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे एक ते दीड तासांनी उपचारासाठी नेण्यास त्यांना विलंब झाला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णवाहिकेने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले खामगावला नेण्यात आले. त्यामुळे मुलांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)