लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे २० जुलै रोजी जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ५९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ५८५ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन, देऊळगाव राजा तालुक्यातील एक, मेहकर एक, नांदुरा एक, जळगाव जामोद तालुक्यातील एकाचा समावेश आहे. हे पाच तालुके वगळता अन्य तालुक्यातील तपासणीकरण्यात आलेल्या संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपचारादरम्यान नांदुरा तालुक्यातील अंबोडा येथील ६७ वर्षीय महिला आणि जळगाव जामोद तालुक्यातील ६५ वर्षीय व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड समर्पीत रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी ५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी झाली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २० हजार ६५१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एकूण कोरोना बाधितांपैकी ८६ हजार ५२८ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, ७ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:10 PM