प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४५१६ जणांचे अहवाल २६ मार्च रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ३,६१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ९०३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ७५, सुंदरखेड २, चांडोळ ४, धाड २, जांब १२, शिरपूर ३, वरवंड ९, मोताळा २, सारोळा ३, चिंचपूर ६, कोथळी ५, तालखेड ५, तरोडा २, धा. बढे २, सिं. राजा १३, साखरखेर्डा २, गुंज ७, सावखेड तेजन २, हिवरखेड ३, वर्दडी ४, कंडारी ४, राहेरी बु. ३, सोनोशी २, बाळसमुद्र ४, चिखली २८, टाकरखेड २, कोलारा ३, कोनड २, शेलोडी २, खामगाव १२०, खुटपुरी २, हिंगणा उमरा ५, गारडगाव ३, सजनपुरी ३, शेगाव ४७, पहुरजिरा २, जानोरी २, नांदुरा ६१, टाकरखेड ४, वडनेर १४, चांदुरबिस्वा ४, शिरसोडी २, पिंप्री अढाव २, पिंपळखुटा धांडे ४, निमगाव ४, खैरा ५, मलकापूर ४९, दसरखेड १७, भाडगणी २, कुंड बु. २, घिर्णी ३, जांबुळधाबा २, उमाळी ९, दाताळा ३, वडोदा २, नरवेल २, दे. ३२, उमरद ४, सिनगाव जहा. ६, दे. मही ४, अंढेरा ५, सावखेड भोई २, मेहकर ४३, हिवरा आश्रम ४, दे. माळी ६, जानेफळ २, बोरी ४, बोथा ३, डोणगाव ३, आंध्रुड ४, सावत्रा २, उमरा देशमुख २, उकळी ८, लोणार ७, पिंप्री ९, मांडवा २, बिबी ३, सुलतानपूर ३, महार चिकना २, पातुर्डा २, सोनाळा २ यासोबतच वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १, अंदुरा १, वालसावंगी १, नया अंदुरा २, बाळापूर १, जालना जिल्ह्यातील दानापारू येथील १, जाफ्राबाद येथील १, वाशीमधील १ चा यात समावेश आहे.
दरम्यान, चिखली तालुक्यतील अमडापूर येथील ४० वर्षीय महिला आणि मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
--४०९२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा--
शुक्रवारी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालापैकी ४०९२ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान ६४४ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ६६४ जणांच्या संदिग्धांचेही अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोबतच २७ हजार ४८० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ५ जण कोरोना बाधित असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६२७८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे २४७ जणांचा मृत्यू झाला आहे.