अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विना परवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणार्या दोन बनावट डॉक्टरांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विरेंद्र सुरजितसिंग आणि सय्यद सिंकदर सय्यद अफसर अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारीनुसार, हरियाणा येथील विरेंद्र सुरजित सिंग आणि बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील सय्यद सिकंदर सय्यद अफसर (३३) हे दोघे सजनपुरी जवळील एका धाब्याशेजारील सय्यद सादिक सय्यद गफार यांच्या घरात रूग्णांची तपासणी आणि औषधोपचार करीत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षक शिवाजी नगर पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलीसांनी संबंधित ठिकाणी मारला. त्यावेळी एका रूग्णालयाला सलाइन लावल्याचे आढळून आले. तसेच दोन काही औषध उपचारासाठी आल्याचे आढळले. यावेळी त्यांच्यावर दोघेजण उपचार करीत असल्याचे िदसून आले. त्यांच्याकडे वैद्यकीय अर्हता प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले.
पंचासमक्ष दोघांची अंगझडती घेण्यात आल्यानंतर एकाकडे रोख ३३ हजार ६०० रूपये , एक दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल, तर दुसर्याकडे एक सहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल, बिट्टू सिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सलिंग पंजाब डिप्लोमा प्रमाणपत्र, बिट्टू सिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सिलिंग डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी प्रमाणपत्र, बिट्टू सिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सलिंग डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी द्वितीय वर्षाचे प्रमाणपत्र, ) बिट्टू सिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सलिंग आयुर्वेदिक फार्मस्टिक सर्टिफिकेट जाहिरात पत्रके आणि इतर साहित्या असा ४९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळला आहे.
याप्रकरणी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वानखडे यांच्या तक्रारीवरून विरेंद्र सिंग आणि सय्यद सिकंदर सय्यद अफसर या दोघांविरोधात शिवाजी नगर पोलीसांनी कलम ३३,३३( अ)३८ महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१सह कलम ४,७ ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज( ऑब्जेक्शनेबल ऍडव्हरटाईजमेंट अॅक्ट)१९५४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.