शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

दोन गटात हाणामारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:57 AM

सिंदखेडराजा : साखरखेर्डा येथील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरुन वाहनचालक व पेट्रोल पंपावरील कामगार यांच्यात भांडण झाले. त्याचा परिणाम म्हणून वाहन चालकाचा पाठलाग करुन त्याला मारहाण करण्यात आली. तेथे काही वेळातच दुसरा गट पोहचून हाणामारी केल्या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही गटावर जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

ठळक मुद्देजमावबंदीचे उल्लंघन २२ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डा येथील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरुन वाहनचालक व पेट्रोल पंपावरील कामगार यांच्यात भांडण झाले. त्याचा परिणाम म्हणून वाहन चालकाचा पाठलाग करुन त्याला मारहाण करण्यात आली. तेथे काही वेळातच दुसरा गट पोहचून हाणामारी केल्या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही गटावर जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. साखरखेर्डा येथील काळीपिवळी चालक बहादूरसिंग राजपूत हा इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेला असता तेथील कामगार बळीराम श्रीराम चांगाडे यांच्यासोबत भांडण झाले. बळीरामने गावातील काही युवकांना मोबाईलवर याची माहिती दिली. दरम्यान १0 ते १५ युवक मोटार सायकलवर पेट्रोल पंपावर आले आणि बहादूरसिंग राजपूत यांचा शोध घेत मलकापूर पांग्रा रोडने निघाले. बहाद्दूरला मारण्यासाठी काही युवक गेल्याची वार्ता साखरखेडर्य़ात पोहचताच दुसरा गटही रवाना झाला. मलकापूर पांग्रा येथे जावून दोन्ही गटात तुंबळ मारमारी झाली. साखरखेर्डा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मलकापूर पांग्रा येथे पोहचले आणि हस्तक्षेप करुन दोन्ही गटाला पिटाळून लावले. मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असता दोन्ही गटाने तक्रार देण्यास नकार दिला. सदर भांडणाची व्हीडीओ क्लिप व्हायरल झाल्याने साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ सुरतसिंग इंगळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बळीराम श्रीराम चांगाडे, राम जयराम अवचार, रवि रामेश्‍वर जगताप, भागवत अशोक खरात, मोहन जयराम अवचार, गोपाल नारायण इंगळे, अमोल गणपत अवचार, विक्रमसिंह भिकनसिंह राजपूत, जालमसिंह तुळशिरामसिंह राजपूत, लखनसिंह बिरबलसिंह राजपूत, सचिनसिंह इश्‍वरसिंह राजपूत, चरणसिंह गंगारामसिंह राजपूत, शुभमसिंह जगदीशसिंह राजपूत, बहाद्दूरसिंह प्रल्हादसिंह राजपूत यासह २२ आरोपी विरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी ३७(१) (३) १३५ मुपोका खाली गुन्हे दाखल केले आहेत. दुर्गा उत्सव काळात गावात शांतता निर्माण व्हावी, म्हणून साखरखेर्डा येथील १0२ नागरिकांना १४४ च्या नोटीसा जारी केल्या आहेत.