खामगाव : शहरातील शिवाजी नगरात जुन्या वादातून दोन गटात सोमवारी रात्री १०.४० मिनिटांनी हाणामारी झाली. या हाणामारीचे रूपांतर तुफान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. या जाळपोळीत दोन दुचाकी, एक हातगाडी आणि एका दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.शहरातील शिवाजी नगरात कबड्डी स्पर्धेच्या वादातून दोन गटांमध्ये फेब्रुवारीमध्ये वाद झाला होता. हा वाद सोमवारी रात्री पुन्हा उफाळून दोन्ही गटातील लोक आमनेसामने आले. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली, तसेच जाळपोळ सुरू केली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला. दोन दुचाकी, एक हातगाडी आणि एका दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. पोलिसांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जाळपोळीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले, शिवाजी नगरचे सुनील हुड, ग्रामीण पोलीस स्टेशनचे रफीक शेख, शहर पोलीस स्टेशनचे तावडे आदी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
दोन गटात जुन्या वैमनस्यातून हाणामारी, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 1:32 AM