खामगाव: तक्रार महिलेच्या मोबाईलमधून तिच्या मित्रासोबतचे व्हीडीओ ओळखीतून घेतले. त्यानंतर तिचे अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन लाख रूपये उकळल्यानंतरही समाधान न झाल्याने तिच्या मालकीची दोन एकर जमिन बळकाविण्याच्या उद्देशाने पती पत्नीने पिडीतेच्या दोन्ही मुलांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याची धमकी िदली. पिडीतेचे अश्लील व्हीडीओ व्हायरल केले. हा धक्कादायक तितकाच किळसवाणा प्रकार खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी तक्रारीवरून अखेर रविवारी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, शहरातील एका वस्तीतील पिडीत महिलेने ओळखीतून एका महिलेने आपल्या मोबाईलमधून तिचे मित्रासोबतचे अश्लील व्हीडीओ तिच्या मोबाईलमध्ये घेतले. काही दिवसानंतर हे व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ओळखीतील महिला आणि तिच्या पतीने पिडीतेकडून जून २०२२ दोन लाख रूपये उकळले. बदनामीच्या भीतीने पैसे दिल्यानंतर आरोपींनी तिला त्यांच्या मोबाईलमधील व्हीडीओ डीलीट केल्याचे सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या नावावर असलेली दोन एकर जमिन न दिल्यास पिडीतेला रस्त्यात अडवून तिच्या दोन मुलांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शहरातील मुख्य रस्त्यावर ४ मे रोजी सकाळी १० वाजता घडली. पिडीतेने जमिन नावावर करून देण्यास नकार दिल्याने आरोपीतांनी संगनमत करून पिडीतेचे अश्लील व्हीडीओ व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी पोलीस तक्रारीवरून शहर पोलीसांनी एका वस्तीतील पती पत्नी विरोधात भादंवि कलम ३८४, ५०६, ३४ सहकलम ६६(ई), ६७ आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत. अश्लील व्हीडीओप्रकरणी दुसरा गुन्हागत काही दिवसांत खामगाव शहरात एकापाठोपाठ एक असे तब्बल ३६ पेक्षा अधिक अश्लील व्हीडीओ व्हायरल झाले. यामध्ये काही प्रतिष्ठातांचाही समावेश आहे. बदनामीच्या भीतीने काही व्हीडीओंचे प्रकरण जागच्या जागीच निस्तरण्यात आले. यासाठी मोठ्याप्रमाणात दबावतंत्राचा वापर झाला. याप्रकरणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधिक्षकांचीही भेट घेतली होती. त्यानंतर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रविवारी याप्रकरणी दुसरा गुन्हा शहर पोलीसांत दाखल झाला आहे.