लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नाकाबंदी दरम्यान ओमनी गाडीतून दोन लाख रुपयांचा विमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दसरखेड एमआयडीसी पाेिलसांनी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर दसरखेडनजीक ३0 ऑक्टोबरला मध्यरात्री केली.मध्यप्रदेशातील इच्छापूर निमखेडी येथून चालक नीलेश साहेबराव दामोधर, उमेश अशोक पांडव ( दोघे रा. नांदुरा) हे एमएच २८ एएन 0३४0 या गाडीने गुटख्याचा माल नांदुरा घेवून जात होते. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून त्यांना दसरखेड फाट्यानजीक गाडीची झडती घेत ताब्यात घेतले. पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक येरळीकर, संजय निंबोळकर, दिलीप रोकडे, आनंद माने, गोपाल इंगळे व सुरजसिंह राजपूत यांनी ही कारवाई केली. त्यात केसरयुकत गुटख्याच्या २२ गोण्या अंदाजे एक लाख ९८ हजार रुपये किमतीच्या मिळून आल्या. सोबतच दीड लाख रुपये किमतीची गाडी असा असा तीन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारमधून दोन लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:22 AM
मलकापूर : नाकाबंदी दरम्यान ओमनी गाडीतून दोन लाख रुपयांचा विमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दसरखेड एमआयडीसी पाेिलसांनी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर दसरखेडनजीक ३0 ऑक्टोबरला मध्यरात्री केली.
ठळक मुद्देविमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले