लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील कोट्यवधी रुपयांच्या आणि तत्कालीन तलाठी राजेश चोपडे प्रमुख आरोपी असलेल्या भूखंड घोटाळ्यातील आणखी दोघांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यामुळे या घोटाळ्याशी संबंधीत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.खामगाव भाग-१ चा तत्कालीन तलाठी राजेश चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी घेतल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार करून सुनियोजित पध्दतीने प्लॉटची खरेदी-विक्री केली. याप्रकरणी अनेकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तलाठी चोपडे विरोधात खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २० जानेवारी रोजी तिघांना अटक करण्यात आल्यानंतर शहर पोलीसांनी १६ फेब्रुवारी रोजी सूरत आणि मुंबई येथील दोघांना अटक केली आहे. खामगाव शहर पोलीस निरिक्षक सुनील अंबुलकर, एएसआय रमजान चौधरी, एनपीसी दिनकर वानखडे, मोनिका किलोलीया यांनी अटक केली.
भूखंड घोटाळ्यात आणखी दोघे सख्खे भाऊ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:34 PM