राहेरी बु : एका कृषी कंपनीच्या एरीया मॅनेजरला शस्त्रांच्या धाकावर लुटणाऱ्या दाेन आराेपींना किनगाव राजा पाेलिसांनी २८ जून राेजी काही तासातच जेरबंद केले़. तसेच त्यांच्याकडून चाेरी केलेला एवज जप्त केला़. दाेन्ही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
वर्दडी परिसरात साेमवारी जाेरदार पाउस झाल्याने नाले तुडंब भरुन वाहत होते़ वदर्डी ते सोनोशी रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्यामुळे रस्त्यावर एका कृषी कंपनीचे ऐरीया मॅनेजरपराग विलास मिरकुटे रा.मुगळा ता.वाशीम ह.मु.देउळगावराजा हे त्यांचे दुचाकीसह पुलाजवळ थांबले होते़. तेथे दोन अनोळखी व्यक्ती दुचाकी जवळ येवुन थांबले व मिरकुटे यांची चाैकशी केली़ मिरकुटे यांनी ओळख दिल्यानंतर त्या दाेघांना त्यांना वर्दडी ते पिंपरखेड बु हा पर्यायी मार्ग असल्याचे सांगितले़. तसेच जंगल भागामध्ये मिरकुटे यांची दुचाकी थांबवून शस्त्राच्या धकावर त्याच्याकडील पैशांचे पाकीट, हातातील घड्याळ, मोबाईल व दुचाकी असा ४७ हजार ७५० रुपयांचा एवज घेउन पळ काढला़. या घटनेमुळे घाबरलेल्या मिरकुटे यांनी पोलीस स्टेशन किनगावराजा येथे सविस्तर माहिती दिली़. त्यानंतर ठाणेदार सोमनाथ पवार यांनी दोन रस्त्याने पाेलिसांचे दोन पथक रवाना केले़ मिरकुटे यांनी सांगितलेली दुचाकी आणि आरोपीचे वर्णनावरून तसेच गाेपीनीय माहितीवरून पाेलिसांनी विजय राठाेड व अमाेल राठाेड यांना अटक केली़. यातील एकाला जालना येथून तर एकाला पिंपरखेड बु.येथून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून चाेरी गेलेला एवज जप्त केला़. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साहेबराव बनसोडे ,पोहेकॉ रमेश गोरे,पोकॉ. सलीम परसुवाले,गजानन सानप,जाकेर चौधरी हे करीत आहे.