लोणार : शहरातील लोणी मार्गावर खटकेश्वर नगरमधील ओम साई ई महासेवा केंद्र आणि कुंभारे विमा सेवा केंद्र मध्ये ८ मे च्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांची चोरीझाल्याचे आढळून आले. ९ मे रोजी सकाळी माहिती मिळताच पोलीस निरीक्षकभाऊसाहेब सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.लोणार झ्र लोणी मार्गावर असलेल्या खटकेश्वर नगरमध्ये भारत दराडे यांचे ओम साई ई महासेवा केंद्र असून त्याठिकाणी भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र ही चालवितात. यामुळे त्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावरपैशाचे व्यवहार होतात. ८ मे ला लग्न सराई दाट असल्यामुळे भारत दराडे रात्री कार्यालयात येऊ शकले नाहीत . त्यांचेवर पाळत ठेऊन असलेल्या चोराने ८ मे च्या रात्री कार्यालयाचे शटर वाकवून चोरी केली. सुदैवानेपैसे वाटप झाल्याने कार्यालयात असलेले ४ हजार ५०० रुपये चोरीला गेले .त्यानंतर शेजारीच असलेल्या कुंभारे विमा सेवा केंद्र च्या कार्यालयाचेहिकुलूप तोडून २२ हजार ५०० रुपये चोरट्याने पळविले. ९ मेच्या सकाळी हाप्रकार शेजार्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी भारत दराडे यांना दुरध्वनीवरून कळविले. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेबसातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला . पुढील कारवाई पो.उ.नि.उकंडरावराठोड करीत आहेत.
लोणार येथे दोन दुकनात चोरी, 27 हजारांचा माल लंपास
By admin | Published: May 09, 2017 1:51 PM