बुलडाणा : जिल्हा परिषदेत गत काही दिवसांपासून कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे, कर्मचाºयांनी धास्ती घेतली आहे. अशातच गुरूवारी आरोग्य विभागाचा एक आणि शिक्षण विभागातील एक कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्यानंतर दोन्ही कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले होते. या कार्यालयांचे निर्जुंतुकीकरण करण्यासाठी चार दिवस लागल्याने कामकाज प्रभावीत झाले होते. सोमवारी सकाळी दोन्ही कार्यालयांचे निर्जुंतुकीकरण करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासकीय यंत्रणा उपाय योजना करण्यात दिरंगाई करीत असल्याचे चित्र आहे. आधी पॉझिटीव्ह रु ग्ण आढळताच तो परिसर सील करण्यात येत होता. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटीन करून तपासणीसाठी नेण्यात येत होते. मात्र, गत काही दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना बसला. आधीच कोरोना संक्रमण वाढत असल्याने कर्मचाºयांमध्ये धास्ती आहे. त्यातच आरोग्य आणि शिक्षण विभागातील कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याने कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण होते. गुरूवारी दुपारी या दोन्ही कार्यालयांचे कामकाज विस्कळीत झाले होते. शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशी दोन्ही कार्यालयाचे निर्जुंतुकीकरण होणे अपेक्षीत होते. मात्र, या दोन्ही कार्यालयांचे सॅनिटायझेशन चार दिवसांनी झाले. शासकीय कार्यालयांची ही अवस्था असताना ग्रामीण भागात निर्जुंतुकीकरणाची काय व्यवस्था असेल यांची कल्पना येते.
बुलडाणा जिल्हा परिषदेत दोन कर्मचारी पॉझिटीव्ह ; कामकाज विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 6:28 PM