शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:13 AM

मेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

ठळक मुद्देधडक सिंचन योजनेचा ९00 शेतकर्‍यांना मिळाला लाभ२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.गेल्या ५ ते ६ वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. पाऊस कमी पडत असल्याने विहिरी, तलाव, धरण यांची पाण्याची पातळी खालावत आहे. उन्हाळ्यातसुद्धा ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच पिण्याच्या पाण्याचीच टंचाई सर्वाधिक भासत आहे. तर पिकांना देण्यासाठी पाणी कसे मिळणार, शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्याची सोय व्हावी, पिकांचे उत्पन्न वाढून शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शासनाने २0१२ साली धडक सिंचन विहीर योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत खर्‍या व पात्र लाभार्थींंना लाभ मिळावा, यासाठी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी त्यावेळी ग्रामीण भागात सर्व्हे करून १ हजार ८४ शेतकर्‍यांची धडक सिंचन विहीर योजनेत निवड केली होती. त्यावेळी सदर विहीर बांधण्यासाठी शासनाकडून १ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये ५६५ शेतकर्‍यांनी विहीर पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर १ लाख रुपयात विहिरीचे बांधकाम होत नसल्याने जवळपास १00 विहिरी अर्धवट स्थितीत पडल्या होत्या. या १00 विहिरी नरेगात वर्ग करून पूर्ण करण्यात आल्या. तर २0१५ मध्ये अडीच लाख रुपये अनुदान देऊन १६ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले होते. तर उर्वरित २२४ विहिरींचे बांधकाम २0१६ ते जून २0१७ पर्यंंत पूर्ण करण्यात आले. खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी आर.पी. पवार, कृषी विस्तार अधिकारी ए.टी. मुळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ९0५ विहिरी पूर्ण करून जवळपास दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे.