सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यामध्ये रेती माफीयांनी धुमाकूळ घा तला असून, बर्याच ठिकाणी रेतीची अवैध वाहतूक आणि साठवण हो त असल्याच्या तक्रारी आहेत. या आधारे अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या चमूने ११ डिसेंबर रोजी पकडले आहे. त्यानंतर अवैध रेतीची वाहतूक करणारे हे ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले. तालुक्यामध्ये अवैध रेती वाहतूक जोमात सुरु आहे. परिसरातील अवैध रेती माफीयांवर तहसीलदार संतोष कणसे, नायब तहसीलदार गणेश माळी यांच्या पुढाकाराने महसूल यंत्रणेने वचकसुद्धा बसविला. तरीही सर्व नियमांना धाब्यावर बसवून अवैध रेतीची वाहतूक सुरुच आहे. तहसीलदार संतोष कणसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील माधव नरसिंग देशमुख रा.सिंदखेडराजा व भगवान नंदाजी खरात रा.पळसखेड झाल्टा यांचे अवैध रेती चोरी वाहतूक करणारे ट्रॅ क्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला लावले व प्रत्येकी ९ हजार ८00 रुपये दंड करण्यात आला. तेव्हा ट्रॅक्टर मालकाने एका व्यक्तीला फोन करुन त्या व्यक्तीने तहसीलदार संतोष कणसे यांच्याशी संपर्क साधला. सदर व्यक्ती व तहसीलदार यांच्यामध्ये फोनवर वादावादी झाली. त्यानंतर सदर व्यक्ती व तहसीलदार कणसे पोलीस स्टेशनमध्ये समोरासमोर आले. त्यांच्यात पुन्हा वाद होऊन हाणामारी होणार, हे लक्षात येताच प्रभारी ठाणेदारांनी त्यांना समजावले. संतोष कणसे यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना जालना येथे नेण्यात आले. ते २0 डिसेंबरपर्यंंत रजेवर आहेत.
अवैध रेतीचे दोन ट्रॅक्टर पकडले
By admin | Published: December 13, 2014 12:21 AM