लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अस्वलाची दोन पिल्लेही येथे मृतावस्थेत आढळल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील निमखेड येथील अशोक मोतीलाल रऊते आणि माना बंडू गवते आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत घरातील गुरेढोरे शोधण्यासाठी गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबाबरवा अभयारण्यात गेले होते.दरम्यान, अभयारण्यात गुरांचा शोध घेत असताना एका अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. एका आदिवासीने या अस्वलास हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने त्याच्यावरही हल्ला करूनत्यास गंभीर जखमी केले. दोघेही अस्वलाने दोघांनाही गंभीर जखमी केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती गावातील काही व्यक्तींना कळाल्यानंतर त्यांनी व ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेमुळे अभयारण्यालगतच्या गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती सोनाळा येथील वन्यजिव वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली. मात्र दुपारपर्र्यंत येथील एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे दोन्ही आदिवासींचे मृतदेह घटनास्थळीच पडून होते. अखेर गुरूवारी दुपारी निमखेडी येथील हबू पवार याने सोनाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार कर्मचाºयांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत आदिवासींचे मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.दोन्ही आदिवाशींच्या पार्थिवाचे शवविच्छेदन वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन त्यांचे पार्थिव करण्यात आले.ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान घटनास्थळी अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी भेट देऊन पाहणी केली आहे.अस्वलाची दोन पिल्लेही मृतावस्थेतअकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक बेऊला, सहाय्यक वनसंरक्षण एल. ए. आवारे यांनी गुरूवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळानजीकच अस्वलाची आठ महिन्याची दोन पिल्ले मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार झाल्याचे प्रकरण आता गंभीर स्वरुन धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत पिल्लांचे शुक्रवारी शवविच्छेदन होईल.
अंबाबरवा अभयारण्यात अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:50 AM