लोकमत न्यूज नेटवर्कशारा : येथून मेहकरकडे जाणाऱ्या एम.एच.२८ व्ही. ५९१० इंडिगोने, सुलतानपूरकडून लोणारला येणाऱ्या बोलेरो एम.एच.३७ जी. ५९५१ रा नावली ता. रिसोड हे शिर्डीवरुन आॅपरेशन करून लोणारमार्गे घराकडे नावली येथे जात असताना शारा येथे ९ जुलै रोजी समोरासमोर अपघात झाला. त्यात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.बोलेरो गाडीतील गजानन राईतकर (वय ४५), शंकर नितनवरे (वय ६०), अनिल रईतकर (३५), गजानन धामणे (४०), पंकज काळे (२३), गणपत सुरुशे (६५), पंचफुलाबाई सुरुशे (६०) सर्व राहणार नावली. समाधान राऊत (२५) रा. अंजनी बु. यांना किरकोळ मार लागल्यामुळे उपचारासाठी लोणार येथे दवाखान्यात नेले.
दोन वाहनांची समोरासमोर धडक; नऊ प्रवासी जखमी
By admin | Published: July 10, 2017 1:06 AM