खामगाव: घरगुती वापराच्या गॅसचा अनधिकृत इंधन म्हणून वापर करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. स्थानिक घाटपुरी नाका परिसरात सकाळी ८:३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की, घाटपुरी नाक्यावरील अनिल नारायण माडीवाले (५०) यांच्याकडे घरगुती गॅसचा वाहनात इंधन म्हणून भरून देण्यासाठी वापर होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाचपणी केली असता, खात्री पटल्यानंतर घटनास्थळी छापा टाकाला. त्यावेळी विनायक नगर वाडी येथील अनिल पुरूषोत्तत्म भारती एमएच२८-सी-३८९७ च्या टाकीमध्ये घरगुती सिलीडर मधुन अवैधरित्या गॅस भरून देत होता. याबाबत गुपमाहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वरील ठिकाणी छापा मारून दोघाना कारमध्ये गत भरताना रंगेहाथ पकडले.
यावेळी पोलिसांनी त्याचेजवळुन कार (कि २ लाख), कॉम्प्रेसर मशीन (कि. ४५ हजार), ४ एचपी कंपनीचे सीलीडर (कि. ५० हजार), २ मोबाईल (कि. ४० हजार) व इतर साहित्य (कि ५ हजार) असा एकुण ३ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एपीआय राहुल जंजाळ यांनी शिवाजी नगर पोलीसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी उपरोक्त आरोपीविरोधात भादंवि कलम २८४, २८५ सहकलम जिवनावश्यक वस्तु अधिनियम ३.७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.