मलकापूर: तालुक्यातील लासुरा गावाजवळून वाहणाºया विश्वगंगा नदीमध्ये पोहावयास गेल्या दोन युवकांचा बुडून दुदेर्वी मृत्यू झाल्याची घटना आज २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याबाबतचे वृत्त असे की, लासुरा गावाजवळून विश्वगंगा नदी वाहते. १ सप्टेंंबररोजी बुलडाणा व मोताळा परिसरात चांगला पाऊस झाल्याने विश्वगंगा नदीला पुर आला. सोमवारी सकाळी सागर विक्रम टोंगळे (वय २९), दिपकसिंग जयपालसिंग राजपूत (वय २७) दोघेही रा.लासुरा हे सकाळी नदी पात्रात पोहावयास गेले होते. मात्र नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोलपाण्यात बुडाले. घटनेचे वृत्त गावात पसरताच गावकठयांनी नदीपात्राकडे धाव घेतली व दोघांनीही पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली.यावेळी आ.चैनसुख संचेती,नगराध्यक्ष अँड हरीश रावळ,भाजपा नेते शिवचंद्र तायडे, मोहन शर्मा आदींनी रूग्णालयात धाव घेवून मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
विश्वगंगा नदीत पोहावयास गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:06 IST