गजानन कलोरेलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे गुरूवारी शेगावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संत गजानन महाराज मंदिरात जावून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्यावतीने विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला महाराष्ट्र शासनाने तत्वत: मान्यता दिल्यानंतर शिवसेनेच्या लढ्याला यश प्राप्त झाल्याच्या पार्श्वभुमीवर श्रींच्या समाधीचे दर्शन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उध्दव ठाकरे गुरूवारी शेगावात दाखल झाले. आल्या आल्या त्यांनी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास श्रींचे दर्शन घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खा. अरविंद सावंत मुंबई, खा. चंद्रकांत खैरे औरंगाबाद, खा. प्रतापराव जाधव, मुंबई मनपाचे महापौर विश्वनाथ महादेश्वर, खा. भावना गवळी, निलमताई गोऱ्हे, आ. संजय रायमुलकर, आ.शशिकांत खेडेकर, स्थानिक पदाधिकारी अविनाश दळवी, दिनेश शिंदे, आशिष गणगणे, संतोष घाटोळ, भावेश शर्मा, योगेश पल्हाडे, गजानन हाडोळे आदी उपस्थित होते.