देऊळगावराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील ४८ ग्राम पंचायतीमधील संगणक परिचालकांनी पंचायत समितीमधील बीडीओ २३ एप्रिल रोजी गैरहजर असल्याने प्रलंबित विविध मागण्यांसाठी पंचायत समितीचे पाटील यांना बेमुदत कामबंद आंदोलनाचे लेखी निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील १ एप्रिल २0११ च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्हय़ातील ग्रामपंचायतीत जन्म-मृत्यू नोंद, रहिवासी दाखला, जागेच्या आठ अ व असा एकूण इतर २७ प्रकारचे दस्त संगणकीय व्हावे, यासाठी आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत विभागामध्ये संगणकीय कक्ष स्थापन करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक संगणकास प्रधान्य देऊन राज्यातील २७ हजार कामगारांना संगणक परिचालकास रोजगार देण्यात आला. कंपनीच्या करारानुसार संगणक परिचालकाच्या कामाचा मोबदला हा निर्धारीत मानधनापेक्षा अर्धा आहे व त्यातही ४ ते ५ महिन्याचा थकीत आहे. सक्तीचे ग्राम पंचायतीतील ४५0 एन्टी डाटाचे टारगेट पूर्ण ना झाल्यास ५0 टक्के कपात केली जा ते. वर्क ऑर्डरच्या नावाखाली संगणक परिचालकाचे वेतन कपात केले जात आहे. सदरची वर्क ऑर्डर रद्द करुन कपात केलेले वेतन त्वरित जमा करण्यात यावे. कंपनी तर्फे काही संगणक परिचालकांस हेतुपुरस्सर कामावरून कमी करण्यात आले आहे. संगणक कक्ष स्थापन झाल्यापासून वेळेत मानधन दिले जात नाही. संगणक दुरुस्ती व छपाई साहित्य वेळेत मिळत नाही, असे विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सिंदखेडराजा विधानसभा म तदार संघाचे लाडके आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना ही निवेदनाची प्रत देण्यात आली.
संगणक परिचालकांचे बेमुदत कामबंद
By admin | Published: April 24, 2015 1:36 AM