वाशिम, दि. २८- : वरिष्ठ स्तरावरून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी नगर परिषद निवडणुकीत युतीसंदर्भात चर्चा केली आणि वाशिमात या चर्चेचे पडसाद उमटले. गुरुवारी सायंकाळनंतर सेना-भाजप युतीबाबत चर्चेच्या फेर्या झडल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, युती झाली तर कुणाच्या उमेदवारीवर गंडांतर येईल, याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहेत. पाच वर्षांंचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने येत्या २७ नोव्हेंबर रोजी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली. २६ ऑक्टोबरपर्यंंत युती अथवा आघाडीबाबत बोलणी नसल्याने इच्छुक उमेदवारांनीदेखील स्वतंत्रपणे अर्ज दाखल झाले. २७ ऑक्टोबरला मुंबई येथे शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीसंदर्भात बोलणी झाली आणि सायंकाळनंतर वाशिम येथे शिवसेना व भाजपाच्या पदाधिकार्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. दोन्ही पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मते युतीसंदर्भात जाणून घेतली जात आहेत. सेना-भाजपाच्या युतीच्या चर्चेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येते. सेना-भाजपची युती झाली तर काँग्रेस-राकाँची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युती कुणाच्या पथ्यावर पडणार, या दृष्टिकोनातून शिवसेना व भाजपाने चाचपणी चालविली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ह्यबेरजेह्णचे राजकारण समोर ठेवून युतीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुरुवातीला स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी शिवसेना व भाजपाने चालविली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ स्तरावरून युतीसंदर्भात बोलणी झाल्याने, ऐनवेळी कोणता निर्णय घ्यावा, याचा पेच सेना-भाजपाच्या स्थानिक नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्याला केवळ एक दिवस शिल्लक असल्याने आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्याने, माघार कोण घेणार, या एकाच मुद्याभोवती युतीची चर्चा घुटमळत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पाचव्या दिवशी १७४ अर्ज दाखलतीन नगर परिषदेच्या निवडणुकीत पाचव्या दिवशी शुक्रवारी एकूण १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. वाशिम येथे पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी ५६ आणि अध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. कारंजा येथे नगरसेवक पदासाठी ३९ आणि अध्यक्ष पदासाठी सात अर्ज प्राप्त झाले आहेत. कारंजा येथे नगरसेवक पदासाठी आतापर्यंंत एकूण ५0 आणि अध्यक्ष पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. मंगरूळपीर येथे नगरसेवक पदासाठी ६२ तर अध्यक्ष पदासाठी सहा अर्ज दाखल झाले. येथे आतापर्यंंत नगरसेवक पदासाठी एकूण ७३ आणि अध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले आहेत.
सेना-भाजप युतीच्या चर्चेने इच्छुकांमध्ये अस्वस्थता!
By admin | Published: October 29, 2016 2:35 AM