त्यानुषंगाने बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय रायमुलकर यांनी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीलगत तीन मीटरची वहिवाटीसाठी जागा सोडण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी ही भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, हे विशेष त्यामुळे १२० मीटर रुंदीचा समृद्धी महामार्गाची संरक्षक भिंत आता दोन्ही बाजूनी प्रत्येकी तीन मीटर आत घेण्यात येऊन शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी जागा उपलब्ध केली जाईल. शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न तथा काही गाव रस्त्यांचा प्रश्न यामुळे मार्गी लागला आहे. बुलडाणा जिल्ह्यात घेण्यात आलेली ही भूमिका प्रसंगी समृद्धी महामार्ग गेलेल्या राज्यातील १४ जिल्ह्यांमध्येही लागू केल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोट
समृद्धी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी संरक्षक भिंतीमुळे येणाऱ्या अडचणी पाहता ही संरक्षक भिंत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन मीटर आत घेण्यात येणार असून तेथे शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी जागा उपलब्ध केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
(उदय भरडे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी)