लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटींचा निधी वाटप करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी जिल्हा स्तरावरून चिखली तालुक्यासाठी दीड कोटी, सिंदखेड राजा तालुक्यासाठी एक कोटी, लोणार तालुक्यासाठी पन्नास लाख, मेहकर तालुक्यासाठी एक कोटी असा एकूण चार कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. सदर निधी हा लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधकाम करून वापरासाठी प्रोत्साहन बक्षिस आहे. याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायतकडे तत्काळ सादर करावे. वैयक्तिक शौचालय बांधले असतील अशा पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामसेवकांनी तयार करून तत्काळ पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छ भारत मिशनकडे सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले आहेशौचालय बांधकाम आणि त्याचा नियमित वापर करण्यासाठी शासनस्तरावर लाभार्थ्यांना बारा हजार रूपये प्रोत्साहन निधी दिला जातो. या रकमेमध्ये दोन शोषखड्ड्यांचे अगदी उपयुक्त शौचालय तयार होतो. करिता उर्वरीत पात्र लोकांनी लवकरात लवकर शौचालय बांधून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच इतर तालुक्यात अजून निधी उपलब्ध आहे. बुलडाणा ५७ लाख, देऊळगाव राजा १० लाख, खामगाव ५२ लाख, शेगाव ६ लाख, संग्रामपूर ३० लाख, जळगाव जा. ७२ लाख, नांदुरा ६० लाख, मलकापूर १० लाख, तर मोताळा ७६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध आहे. यामध्ये खामगाव समितीकडे पुवीर्चा निधी उपलब्ध असल्याने त्यांना निधी देण्यात आला नाही. तर मलकापूर आणि शेगाव प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटी निधी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 7:33 PM
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटींचा निधी वाटप करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी जिल्हा स्तरावरून चिखली तालुक्यासाठी दीड कोटी, सिंदखेड राजा तालुक्यासाठी एक कोटी, लोणार तालुक्यासाठी पन्नास लाख, मेहकर तालुक्यासाठी एक कोटी असा एकूण चार कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.
ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी चार कोटी निधी वितरीत लाभार्थ्यांना बारा हजार रूपये प्रोत्साहन निधी