संग्रामपूर (बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील शिवारात सागर दिनकर वाघ (२४) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने चार पानी चिठ्ठी लिहिली असून त्यात शासकीय व्यवस्थेचा बळी ठरत असल्याचे म्हटले आहे.सागर हा उच्चशिक्षित होता. त्याने एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले; मात्र बेरोजगारीपुढे हतबल झाला. संग्रामपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रमधील बँक व्यवस्थापनाने सतत दोन वर्षे मुद्रा कर्जासाठी उंबरठे झिजवायला लावले; परंतु कर्ज मिळाले नाही. त्यामुळे आपण जीवन संपवित असल्याचे त्यांने चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी संग्रामपूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखाधिकाऱ्यावर आत्महत्येसप्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.माझ्या मृत्यूनंतर कुटुंबाला५ लाख रुपयांची मदत द्यावी, तोपर्यंत माझा मृतदेह ताब्यात घेऊ नये, असेही चिठ्ठीत नमूद असल्याने गावकºयांनी सागरचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दुपारपर्यंत मृतदेह तहसील कार्यालयातच होता.
मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 5:09 AM