बुलढाणा/ मलकापूर : आपण एक शेतकरी पुत्र असून माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे (कृषिपंप) वीजदेयक भरले नाही. वीज रोहित्र जळाले की, अभियंत्याला हजार दोन हजार जे काही असे ते द्यायचे आणि वीज रोहित्र बसवायचे हा प्रकार सुरू होता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी मलकापूर येथे केले.
मंत्री जाधव एका कार्यक्रमात म्हणाले, माझे आजोबा, वडील आणि आम्ही कधीही वीज देयक भरले नाही. रोहित्र जळाले की अभियंत्याला हजार, दोन हजार रुपये देऊन नवीन डीपी बसवून घ्यायचो. महायुतीच्या सरकारने राज्याच्या विकासासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. महायुतीने शेतकऱ्यांचे गेल्या ५० वर्षांतील थकीत वीज देयक माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भारनियमनामुळे रात्री शेती सिंचन करावे लागत होते. आता दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले मंत्री जाधव एका कार्यक्रमात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हवे तर नो ड्यूज देतो आपण प्रातिनिधिक स्वरूपात हे वक्तव्य केले. त्याचा विपर्यास होत आहे. आपण शेतीच काय अन्य करांसह शासकीय देणीही नियमित भरतो. हवे तर नो ड्यूजसुद्धा देऊ शकतो. - प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री