हर्षनंदन वाघलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ वंशावळ असलेल्या जनावरांच्या ओळखीसाठी दुधाळ जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' देण्यात येत असून जिल्ह्यातील २३० जनावरांना 'टॅग' लावण्यात आले आहे. अशा प्रकारे टॅग लावण्यात बुलडाणा जिल्हा विभागात तिसरा ठरला आहे.केंद्र शासनाने नागरिकांना आधार ओळखपत्र दिले आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीचा इत्यंभूत डाटा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे आता दुधाळ जनावरांपैकी गाय व म्हशी वगार्तील जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' दिला जात आहे. जिल्ह्यात १२९ पशुवैद्यकीय संस्था आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या १२२ संस्था असून राज्यशासाच्या ७ पशुवैद्यकीय संस्था आहे. या संस्था प्रमुखांकडे गायी व म्हशींना 'टॅग' लावण्याचे काम सोपविण्यात आले आहे. टॅग लावलेल्या जनावरांची इत्यंभूत माहिती शासनाकडे आॅनलाईन पाठवावी लागत आहे. ह्यडाटा अपलोड' करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला 'इनॉफ' साफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाने तुर्तास जिल्ह्यास ३ हजार टॅग उपलब्ध करून दिले आहेत. जूनपासून आतापर्यंत २३० जनावरांना टॅग लावण्यात आले आहेत. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती दुधाळ जनावरे आहेत व कोणत्या जनावरांची प्रजननक्षमता सर्वाधिक आहे, ही माहिती शासनाला मिळणार आहे.
उत्कृष्ठ वंशाचे जनावरे शोधणे कठिणशासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नवा उपक्रम सुरू केल्यामुळे शासनाल चांगले, उत्कृष्ठ, जातीवंत जनावरे किती आहेत, याची माहिती मिळणार आहे. मात्र यासाठी पशुसंवर्धन विभागातील कर्मचाºयांना नियमित कामे करून 'टॅग' लावण्याचे काम करावे लागत आहे. टॅग लावल्यानंतर त्याबाबतची इत्यंभूत माहिती आॅनलाईन 'अपलोड' करावी लागत आहे.
जिल्ह्यातील सर्वच जनावरांना 'युनिक आयडी कोड'देण्यात येणार नसून उत्कृष्ठ, जातीवंत दुधाळ जनावरांना आयडी कोड दिला जात आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत असून शासनाला माहिती पाठवित आहेत.- डॉ.एस.सी.पसरटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.