शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

मलकापूरनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगाव जिल्ह्यातील युवक ठार, आई गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 1:40 PM

मलकापूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार युवक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेली त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वीज वितरण कंपनीच्या उप केंद्रासमोर शनिवारी सकाळी ८.४० वाजता घडली.

ठळक मुद्दे ऋषीकेश लक्ष्मण करनाटके (१९) आणि त्याची आई बेबीबाई लक्ष्मण करनाटके (५६) दोघे मोटारसायकल क्रमांक एम.एच १९ एन ४8२ या मोटारसायकलीने  चिंचाळा ता. यावलकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील  वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रासमोर त्यांच्या मोटार सायकलीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ऋषीकेश करनाटके हा तरूण उजव्या बाजूला रस्त्याच्या मधोमध फेकल्या गेला. विरूध्द दिशेने भरधाव वाहनाने त्याला चिरडले.

मलकापूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार युवक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेली त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वीज वितरण कंपनीच्या उप केंद्रासमोर शनिवारी सकाळी ८.४० वाजता घडली.

जळगाव खांदेश जिल्ह्यातील चिंचाळा येथील ऋषीकेश लक्ष्मण करनाटके (१९) आणि त्याची आई बेबीबाई लक्ष्मण करनाटके (५६) दोघे मोटारसायकल क्रमांक एम.एच १९ एन ४8२ या मोटारसायकलीने  चिंचाळा ता. यावलकडे निघाले होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील  वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रासमोर त्यांच्या मोटार सायकलीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बेबीबाई डाव्या बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या. तर ऋषीकेश करनाटके हा तरूण उजव्या बाजूला रस्त्याच्या मधोमध फेकल्या गेला. विरूध्द दिशेने भरधाव वाहनाने त्याला चिरडले. त्याच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा होवून तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी व नागरिकांनी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गुलाबराव गायकवाड व सहकाºयांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी बेबीबाई करनाटके यांना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पुढील तपास मलकापूर पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :MalkapurमलकापूरJalgaonजळगावAccidentअपघात