लोकमत न्यूज नेटवर्कधाड : स्थानिक कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर शेतकर्यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी मालाची खरेदी करत प्रत्येक मालामध्ये मातीचे प्रमाण अंदाजे अव्वाच्यासव्वा गृहीत धरून कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित मशिनीद्वारे काढून शेतकर्यांची अक्षरश: फसवणूक सर्रास होत आहे. यावर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. भरीसभर दिवसभर खरेदी करण्यात येणार्या कृषी मालाच्या शेतकर्यांना कच्च्या पावत्या देण्यात येत आहेत, तर शासनाने बंधनकारक केलेले हमीभावाचे माहिती फलकही या ठिकाणी लावण्यात आलेले नाही. या ठिकाणी तालुक्यातील व मराठवाड्यातील अनेक गावांतून शेतकरी आपला शेतीमाल विक्रीस आणतात. यावर शेतकर्यांना माफक दर मिळून त्यांच्या शेतमालास योग्य न्याय मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समि तीची भूमिका महत्त्वाची असताना या मार्केटमध्ये सरसकट शे तकर्यांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे धाडच्या धान्य मार्केटमध्ये दररोजचे भाव व हर्रासी पूर्णपणे बंद असून, मनमानी करत व्यापारी आपल्या पद्धतीत कमी दराने शेतीमाल खरेदी करून आपला फायदा करून घेताहेत.या ठिकाणी येथील व्यापारी सर्रासपणे शेतकर्यांची अडवणूक करत आहेत. सध्या सोयाबीन २२00 ते २४00 रू. प्रती क्विंटल खरेदी होत आहे. त्यात प्रती क्विंटल ४ किलो माती प्रमाण वळती करून, ओलावा काढून ३ ते ४ किलो कपात गृहित धरून प्रती क्विंटल ७ ते ८ किलो सोयाबीन कपात करण्यात येत आहे. साधारण २४00 रु. जरी दर प्रती क्विंटल भाव दिला, तरी १९५ रु. प्रतिक्विंटल पैसे व्यापारी शेतकर्यांचे कपात करत आहेत. परिणामी, वास्तवात सोयाबीन २000 ते २२00 रु. प्रमाणे प्रति िक्वंटल दर मिळत असल्याने शेतकरी नागवल्या जात अस तानाही कृषी उत्पन्न बाजार समितीस त्याचे सोयरसुतक नाही. धाडच्या बाजार समितीमध्ये होणारी पिळवणूक संबंधित बाजार समिती उघड्या डोळ्यांनी पाहूनही गप्प का? हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. या मार्केट यार्डात असणार्या व्यापार्यांचे माल खरेदी परवानेपेक्षा अधिक क्षमतेने माल खरेदी होते. सर्रासपणे कच्च्या खरेदीच्या पावत्या शेतकर्यांना दिल्या जात असल्याने व्यापारी मोठय़ा प्रमाणावर टॅक्स वाचवत आहे, तर यामधून आ िर्थक लाभ उठवत आहे. हे सर्व घडत असताना संबंधित कृषी उ त्पन्न बाजार समिती प्रशासनाचे यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. एकूणच व्यापारी वर्ग शेतकर्यांचा शेतीमाल खरेदी करताना कुठल्याही नियमांचे पालन करत नसल्याने या ठिकाणी त्यांची मनमानी वाढीस लागली आहे.
- शेतीमाल ओलावा तपासण्यासाठी मशीन विनाप्रमाणित- कोणत्या मालाचे ओलाव्याचे किती प्रमाण असावे, याचा बोध नाही वा शासनाकडून तसे निर्देश नाही- नगदी रोख रक्कम शेतकर्यांना अदा करण्यात येत नाही.- कुठलाही शेतमाल खरेदीची पक्की बिल पावती देण्यात येत नाही.- हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करताना शेतमालात मातीचे प्रमाण व ओलाव्याचे प्रमाण अव्वाच्यासव्वा कापून, पैसे कपात होत आहे.