शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:33 AM

शनिवारी दुपारी बुलडाणा तालुक्यासह मोताळा तालुक्यातील तारापूरसह काही भागात पाऊस झाला. बुलडाणा शहरात हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. दुपारी सोसाट्याच्या ...

शनिवारी दुपारी बुलडाणा तालुक्यासह मोताळा तालुक्यातील तारापूरसह काही भागात पाऊस झाला. बुलडाणा शहरात हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडला. रात्री आठ वाजेच्या सुमारास बुलडाणा शहर परिसरात पुन्हा जोरदार पावसास प्रारंभ झाला. रात्री दरम्यान जिल्हास्तरावर या अवकाळी पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान खामगाव व नांदुरा तालुक्यातही या पावसाने मोठे नुकसान केले आहे. चिंचपूर आणि बोरीअडगाव या भागातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.

१९ मार्च रोजी चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, मोताळा, मेहकर तालुक्यात काही भागात गारपीट झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

--१.९ मिमी पावसाची नोंद--

शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाची जिल्ह्यात सरासरी १.९ मिमी नोंद झाली आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यात ८.७ मिमी, चिखली ३.६ मिमी, मेहकर २.९ मिमी, सि. राजा दोन मिमी, खामगाव २.२ मिमी, मोताळा ३.६ मिमी, नांदुरा १.३ मिमी, याप्रमाणे नोंद झाली आहे. अन्य तालुक्यात तुलनेने तुरळक स्वरुपात हा पाऊस पडला.