शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

जिल्हा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

By admin | Published: March 16, 2017 3:11 AM

बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

बुलडाणा, दि. १५- बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,शेलसूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नागपूर आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे आयोजन २६ मार्च रोजी करवंड, ता. चिखली येथे करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार गोपाल वाकोडे यांनी साकारलेल्या या बोधचिन्हातील लेखणी हे निर्मितीचे प्रतिक तर मोर हे सौंदर्य व कलेचे सूचक आहे. या दोघांचा संबंध साहित्य निर्मि तीशी असून समाजाजीवन हे त्याचे अधिष्ठान आहे, असा आशय यातून प्रतीत होतो, असे भावपूर्ण उद्गार अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काढले. या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. सुनील देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य नरेंद्र लांजेवार, स्त्रीमुक्ती संघटनेच्या डॉ. इंदुमती लहाने, शाहिणा पठाण, कवयित्री सुवर्णा पावडे- कुळकर्णी, नाट्यकर्मी अनिल अंजनकर, ज्येष्ठ कवी सुदाम खरे, रणजीत राजपूत, अरूण जैन, विवेक चांदूरकर, पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख, प्रा. निशिकांत ढवळे, अजय दराखे, मिलिंद चिंचोळकर, प्रा. अनिल रिंढे, दिपक मोरे, विशाल पवार, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी स्वागताध्यक्ष प्रा. सुनील देशमुख यांनी बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे बोधचिन्ह हे साहित्य व समाजासाठी सूचक आणि अर्थपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.