लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : परिसरातील अवैध रेती साठ्यांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत ११० ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील अवैध रेती वाहतूक आणि गौण खनिज उत्खननाकडे खामगावच्या महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे अधोरेखीत होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यासह परिसरात अवैध रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महसूल विभागातील काही कर्मचारी आणि अधिकाºयांच्या कृपादृष्टीने खामगाव परिसरात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असल्याचे दिसून येते. रात्रीच्या अंधारात गौण खनिज वाहतूक आणि उत्खनन करणे गुन्हा असतानाही खामगाव आणि परिसरात राजरोसपणे गौण खनिजाचे उत्खनन केल्या जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत असतानाच, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या पथकाने खामगाव तालुक्यातील वाडी येथील गट नं. ८ मधील ५५ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला. त्याचप्रमाणे निमकोहळा येथील गट नं २२५ मधील ५५ ब्रास रेतीसाठा असा एकुण ११० ब्रास रेतीसाठा जप्त केला. जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते, नायब तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, शिपाई हिवाळे आणि चालक यादव यांनी ही धडक कारवाई केली. याकारवाईमुळे अवैध रेती साठा करणाºयांचे धाबे दणाणले आहे.या कारवाईदरम्यान तहसिल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांना अलीप्त ठेवण्यात आले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.‘महसूल’विभागाची चुप्पी!खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून पाच हजार ब्रास तर पारखेड येथील लघु प्रकल्पातून ३०० ब्रास मुरूमाचे रॉयल्टीविना उत्खनन करण्यात आले. याप्रकाराबाबत सर्व पुरावे उपलब्ध असतानाही महसूल विभागाकडून आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप सामान्यांकडून होत आहे.
११० ब्रास अवैध रेतीसाठा जप्त!तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध रेती वाहतूक, व्यवसायाकडे खामगाव महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. परिणामी, रविवारी बुलडाणा अप्पर जिल्हाधिकाºयांच्या भरारी पथकाने वाडी आणि निमकोहळा येथे ११० ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त केला.