खामगाव : एबीएम सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर राज्यातील दोन महानगर पालिका आणि १३ पालिकांमध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये अद्ययावत कर वसुली प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. राज्यातील दोन महापालिका आणि १३ नगर पालिकांमध्ये करवसुलीची अद्ययावत प्रणाली सुरळीत होताच, आता या प्रणालीद्वारे करवसुलीसाठी राज्यातील २५ नगर पालिका आणि २१२ नगर पालिकांमध्ये प्रायोगिक तत्वार नवीन प्रणालीचा वापर सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे.
मालमत्ता आणि पाणी पट्टी वसुलीसाठी यापूर्वी एबीएम सॉफ्टवेअर कंपनीने विकसीत केलेली प्रणाली वापरली जात होती. दरम्यान, या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर इनोव्हेव आयटी इन्फ्रा प्रा.लि.ने विकसीत केलेल्या अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करवसुलीसाठी आता संपूर्ण राज्यभर केल्या जाणार आहे. राज्यात २०१२-१३ पासून महाराष्ट्र नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून राज्यभर वापरले जाणारे एबीएम सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता.
१५ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कर वसुली सुरळीत! -नराज्यातील उल्हास नगर आणि पनवेल महापालिकेसह खामगाव, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, रोहा, अलिबाग, सावंतवाडी, मुरबाड, लांजा, सातारा, जालना, भंडारा आणि जामनेर नगर पालिकेत इनोव्हेव आयटी इन्फ्रा प्रा.लि.ने विकसीत केलेल्या अद्ययावत सॉफ्टवेअरद्वारे करवसुली सुरळीत करण्यात आली आहे.
२३७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रायोगिक तत्वावर कर वसुली! -अद्ययावत प्रणालीद्वारे राज्यातील १५ स्थानिक स्वराज्य संस्था (दोन महापालिका आणि १३ नगर पालिका) मध्ये करवसुली सुरळीत झाली. त्यानंतर २५ महानगर नगर पालिका आणि २१२ नगर पालिका अशा एकुण २३७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रणालीद्वारे कर वसुली केली जाणार आहे.