लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्वेताताई महाले, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ष्णमुख राजन, नगर परिषद उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, समाज कल्याण सभापती गोपाळ गव्हाळे, जि.प. सदस्य जयश्रीताई टिकार, मालुबाई मानकर, वर्षा उंबरकार, रेखा महाले, पंचायत समिती उपसभापती भगवानसिंह सोळंके, गटविकास अधिकारी शिंदे, शत्रुघ्नं पाटील, गजानन देशमुख, नगर पालिकेच्या शिक्षण सभापती भाग्यश्री मानकर यांची उपस्थिती होती.
विरोधकांकडून स्व:स्वार्थासाठीच सत्तेचा वापर - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:18 PM
खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.
ठळक मुद्देखामगाव येथ आयोजित मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद