दिवसेंदिवस पाण्याची तीव्रता जाणवत असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीने पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन आहे, जल है तो कल है, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पाण्याचे वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी शिळे झाले म्हणून वाया घातले जात. परंतु पाणी हे कधी शिळे होत नाही म्हणून पाणी वाया घालवू नये तसेच वापरलेल्या पाण्याचा म्हणजे उदा. आंघोळीचे पाणी व इतर सांडपाणी वाया जाऊ न देता शोषखड्ड्याचा वापर करून त्यामध्ये सोडावे. म्हणजे रस्त्यावर घाण होणार नाही व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे आवाहन येथील विनोद सातपुते यांनी केले.
पाण्याचा वापर काटकसरीने करा -विनोद सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:34 AM