मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे अैापचारिक उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजार असणाऱ्यांनी नोंदणी करून या केंद्रातून लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी लसीकरण केंद्राची पाहणी करून काही महत्त्वाच्या सूचनाही उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी केल्या आहेत.
या वेळी तहसीलदार सैफन नदाफ, रुग्ण कल्याण समितीचे डॉ. खुशालराव मापारी, प्रकाशराव मापारी, नगराध्यक्षा पूनम पाटोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, ठाणेदार रवींद्र देशमुख, पालिका मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोज शाह, कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, डॉ. मंगेश सानप, डॉ. राजेश मुंदडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम माल, डॉ. कविता मापारी, डॉ. निखिल अग्रवाल उपस्थित होते. लोणारमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याची स्थानिकांची मागणी होती. त्या अनुषंगाने अखेर हे केेंद्र आता सुरू झाले आहे.