शासनाच्या वतीने दरवर्षी पोलिओ डोज पाजण्यासाठी विषेश मोहीम राबविण्यात येत असून ३१ जानेवारीला संपूर्ण देशात ही मोहीम राबविण्यात येत आहे. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या साखरखेर्डा , शिंदी , राताळी , मोहाडी , सवडद , गुंज , वरोडी , शेवगा जहागीर , सावंगी भगत , गोरेगाव , उमनगाव , पांग्रीकाटे , सायाळा , लिंगा , बाळसमुंद्र , राजेगाव , जागदरी , जनुना , तांडा , शेंदुर्जन , पिंपळगाव सोनारा , तांदूळवाडी या ठिकाणी ४१ बुथ स्थापन करण्यात आले आहेत . सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओचा डोज दिल्या जाणार आहे . यासाठी उपकेंद्रावरील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका , आशा सेविका , अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे . साखरखेर्डा आणि शेंदुर्जन येथील बसस्थानकावर बुथ राहणार असून एक मोबाईल किम कार्यरत ठेवण्यात आली आहे . प्रत्येक मातांनी आपल्या पाल्याला पोलिओचा डोज पाजण्यासाठी बूथवर आणावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी केले आहे .
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:31 AM