बुलडाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील ते मूळचे रहिवासी आहेत. २०१२ मध्ये ते भारतीय वायुदलात भरती झाले होते. बेळगाव येथे त्यांचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिलाँग येथे कर्तव्य बजावले होते. त्यानंतर त्यांची दिल्ली येथे बदली झाली होती. गेल्या दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्गाने ग्रासले होते. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावली. त्यातच १५ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दिल्ली येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचे थोरले बंधू प्रकाश चौधरी यांनी दिली. शांत आणि मितभाषी असलेल्या वैभव चौधरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आई, वडील, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. दरम्यान, वैभव चौधरी यांची प्रकृती खालावल्यानंतर गुरुवारी त्यांची आई, वडील व अन्य दोन नातेवाईक दिल्ली येथे गेले आहेत.
वायुसेनेत कार्यरत जिल्ह्याचे सुपुत्र वैभव चौधरी यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:34 AM