शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

युवकांमध्ये रुजविले जातेय भाजीपाला उत्पादनाचे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:44 IST

बुलडाणा: संरक्षीत भाजीपाला लागवड कशी करायची व उत्पादन वाढीचे तंत्र युवकांना अवगत व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्यावतीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

ठळक मुद्देभाजीपाला लागवडीच्या विविध पैलूंवर ग्रामीण भागातील शेतकरी युवकांना धडे दिले जात आहेत. विविध योजना या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षणार्थी शेतकºयांना देण्यात येत आहे. 

 

बुलडाणा: संरक्षीत भाजीपाला लागवड कशी करायची व उत्पादन वाढीचे तंत्र युवकांना अवगत व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्यावतीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजीपाला लागवडीच्या विविध पैलूंवर ग्रामीण भागातील शेतकरी युवकांना धडे दिले जात आहेत. शासनाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण या विभागांतर्गत कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रम योजनेतून येथील कृषि विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. येथील कृषि विज्ञान केंद्राच्या सभागृहामध्ये संरक्षीत भाजीपाला लागवड या विषयावर ग्रामीण शेतकरी युवकांकारिता कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रम ३ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमावर मार्गदर्शन केले.  शेतकºयांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संरक्षीत भाजीपाला लागवडीकडे वळण्याचे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सी. पी. जायभाये यांनी संरक्षीत भाजीपाला लागवडीचे महत्व पटवून देताना हरित गृहातील खत, तन व पाणि व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भाजीपाला पिकांच्या लागवडीची सद्यस्थिती, व्याप्ती आणि महत्व संरक्षीत संरचना, संरक्षीत फळेवर्गीय आणि वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, हरितगृहातील कीड व रोग तसेच तण, पाणि आणि खत व्यवस्थापण संरक्षित भाजीपाला लागवड संबंधित कृषि विभागाच्या विविध योजना या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षणार्थी शेतकºयांना देण्यात येत आहे. 

शास्त्रज्ञांचे मिळते मार्गदर्शनग्रामीण शेतकरी युवकांकारिता कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्याच दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. श्याम घावडे यांनी भाजीपाला लागवडीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक जायभाये,  आत्माचे उप प्रकल्प संचाल जयंत गायकवाड, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. अनिल तारू,  राहुल चव्हाण, डॉ. जगदीश वाडकर, डॉ. गणेश काळूसे, डॉ. स्नेहलता भागवत, डॉ. भारती तिजारे कुंतल सातकर आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.कॅप्शन- प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाईक व अन्य.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती