लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्ग व साथ रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ््यात जिल्ह्यातील ३३ गावांमध्ये वाहन पोहोचू शकत नसल्याची माहिती नव्याने घेण्यात आलेल्या आढाव्या दरम्यान समोर आली आहे. परिणामी या गावांमध्ये आता प्राथमिक स्वरुपात औषधींचा साठा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे प्राथमिक स्वरुपातील हा साठा गावातील आशा वर्कर्सकडे ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या असून गावातील आरोग्य सेवकाला परिस्थितीचा अंदाज घेवून औषध साठ्यासह गावातच मुक्कामी राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागानेही यंदा नव्याने घेतलेल्या आढ्याव्यामध्ये पावसाळ््यात या गावात पुरासह तत्सम कारणांमुळे वाहन पोहोचू शकत नसल्याचे समोर आले. प्रामुख्याने जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांपकैी १४ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ही गावे येतात. यात पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत तब्बल आठ गावे असून सोनाळ््यातंर्गत पाच गावांचा समावेश आहे तर संग्रामपूर आणि पिंपळगाव काळे आरोग्य केद्रातंर्गत प्रत्येकी तीन गावांचा समावेश आहे. पातुर्ड्यांतर्गत आस्वद, टाकळी, कुटे गाव, भोन, विटखेड, पेसोडा, देऊळगाव, नळवापूर, सोनाळ््यातंर्गत आंबाबरवा, चुनखडी, शिवणी, शेंबा, गुमठी या गावांचा समोश आहे. संग्रामपूरतंर्गत मालठाणा, शेवगाव बु. उकडगाव आणि पिंपळगाव काळेतंर्गत मनमकराड, गोळेगाव आणि भुरासरड ही गावे येतात. जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या गावामध्ये वाघदेव, वडाळी, दहिगाव, चिंचखेड, गोसिंग, खेडगाव, तौडी, गेरू, सारोळा, खोलखेडचा समावेश आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने याबाबत अधिक सतर्कता बाळगली जात आहे. गेल्या सात वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील १९ गावात गॅस्ट्रोसहसह अन्य साथरोगांचा उद्रेक झालेला आहे. २०१३ पासूनची यासंदर्भातील माहिती आरोग्य प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासली असून जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीही याचा सविस्तर आढावा घेतला आहे. सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता आरोग्य विभागाने पावसाळ््याच्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सुचना आरोग्य सेवकांना दिल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील ३३ गावात पावसाळ्यात पोहोचत नाही वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 11:08 AM