बुलडाणा : स्थानिक विदर्भ महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सत्र २०१७-१८ ची इतिहास अभ्यास मंडळाची समिती गठीत करुन अभ्यास मंडळाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.यावेळी अभ्यास मंडळाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.अण्णासाहेब म्हळसणे हे होते तर प्रमुख अतिथी प्रा.राहुल इंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.संगीता पवार यांनी केले. यावेळी अभ्यास मंडळ स्थापण्याचा हेतू काय असतो? व दरवर्षी आपण या अंतर्गत कोणकोणते उपक्रम राबवितो याचा अहवाल सादर करुन प्रा.संगीता पवार यांनी या वर्षीची अभ्यास मंडळाची समिती जाहीर केले. यामध्ये अध्यक्ष म्हणून बी.ए.भाग २ ची विद्यार्थीनी नेहा दिलीप जाधव, उपाध्यक्ष रुपाली अजय झिने, सचिव देवानंद उबरहंडे व कोषाध्यक्ष अनिता अरुण पुराणिक यांची निवड झाली सदस्य म्हणून राजू राठोड, सुस्मिता दुर्वे, प्रगती पवार, करण चव्हाण, सप्ना मोरे यांची निवड करण्यात आली.(प्रतिनिधी)
विदर्भ महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाची समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:24 PM