ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 6 - मलकापूर रोडवरील राजूर घाटानजीक असलेल्या मुख्य रस्त्यावरील मोहेगावजवळील रस्त्यावर चार फूट लांब असलेला कोब्रा जातीचा नाग रस्त्याच्या मधोमध फण काढून बसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. उपराज्य महामार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. कोब्रा नाग रस्त्यावरच असल्याने बघ्यांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे परिसरात नाग पाहण्यासाठी कुतूहलाचा विषय बनला होता. जवळपास 1 तास हा नाग रस्ता अडवून उभा होता. आजूबाजूला जमलेल्या जमावामुळे तो नाग काहीसा बिथरला होता. मात्र काही काळानंतर तो जंगलात निघून गेला.