ऑनलाइन लोकमत
मेहकर, दि. 27 - प्रत्येक पक्षाला सत्ता पाहिजे. परंतू सत्ता आल्यानंतर त्यांना शेतक-यांचा विसर पडतो. मग आम्ही आमची शेती शासनाच्या समृद्धी मार्गासाठी कशाला द्यायची. मुख्यमंत्र्यानी खुर्ची सोडावी, आम्ही आमची शेती सोडतो, असा प्रश्न मेहकर तालुक्यातील फर्दापूर शिवारातील संतप्त शेतक-यांनी समृद्धी मार्गाच्या मोजणीदरम्यान अधिका-यांसमोर उपस्थित केला.
नागपूर-मुंबई समृद्धी मार्गासाठी सध्या शेतशिवारामध्ये मोजणी सुरू आहे.मेहकर तालुक्यातील हजारो एकर शेती समृद्धी मार्गात जात असून, तालुक्यातील फर्दापूर शिवारातील ५०० एकरपेक्षा जास्त शेती समृद्धी मार्गात जात आहे.
२७ फेब्रुवारी रोजी मेहकर तहसिल व समृद्धी मार्गाचे काही अधिकारी फर्दापूर शिवारात मोजणी करण्यासाठी गेले असता, परिसरातील शेतक-यांनी समृद्धी मार्गाची मोजणी बंद पाडली. आम्ही आमच्या शेतीची मोजणी करू देणार नाही, अशी ठाम भूमीका या शेतक-यांची होती. तेंव्हा मेहकर तहसिलदार कव्हळे यांनी शेतात जावून शेतक-यांशी चर्चा केली. मात्र, शेतकºयांनी आपली जमीन देण्यास नकार देवून शासनाने आमच्यासाठी काय केले म्हणून आम्ही आमची जमीन सोडायची असा, प्रश्न काही संतप्त महिला शेतक-यांनी यावेळी उपस्थित केला.
https://www.dailymotion.com/video/x844t78