ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 15 - संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पालख्यांनी शेगावची वाट धरली आहे. प्रगटदिनानिमित्त संपूर्ण राज्यातून पालख्या शेगाव येथे येतात. बोदेगाव येथून शेगावसाठी
मुक्ताई भजनी मंडळाची पालखी 15 फेब्रुवारी रोजी रवाना झाली. शेगावीचा राणा संत गजानन महाराज प्रगटदिन 18 फेब्रुवारी रोजी आहे. शेगाव येथे प्रगटदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता संपूर्ण राज्यातील भक्तगणांच्या पालख्या सहभागी होतात.
या पालख्यांकरिता विविध सामाजिक संस्था तसेच संघटनांच्यावतीने चहा, नास्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. जिल्ह्यातील बोदेगाव येथून दरवर्षी मुक्ताई भजनी मंडळाच्यावतीने शेगावला पालखी नेण्यात येते. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
सदर पालखी 15 फेब्रुवारी रोजी रवाना झाली. बुलडाणा शहरात ठिकठिकाणी या पालखीचे स्वागत व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
https://www.dailymotion.com/video/x844r5j