ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि.18 - देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या प्रमाणात जगदंबा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या चेहऱ्याचा रंग लाल असतो. दुर्गेची रुपे विविध असून वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. अश्विन शुध्द प्रतिपदेपासून देशभरात नवरात्रोत्सव साजरा होतो. मात्र त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपासून फक्त खामगाव येथे जगदंबा उत्सव साजरा होतो. महिषासूर या राक्षसाचे अत्याचार वाढल्याने शक्तीचे रुप दुर्गेकडून विजयादशमी दसऱ्याला महिषासूर या असुराचा वध होतो. महिषासूराच्या वाढलेल्या अत्याचारामुळे दुर्गेचा चेहरा क्रोध आल्याने लालबुंद होतो. त्यामुळेच येथे कोजागिरी पौर्णिमेला स्थापना होणाऱ्या मातेच्या चेहऱ्याचा रंग लाल असतो. क्रोधीत झालेल्या मातेला शांत करण्यासाठी खामगाव येथे या शांती उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरु झाली आहे. अनेक मंडळांच्या दुर्गेच्या जगदंबा, कालिंका, सप्तश्रुंगी, भवानी, महालक्ष्मी अशा विविध रुपातील मूर्ती स्थापन करण्यात येत असताना अनेक मंडळांच्या मातेच्या मूर्तीचा चेहरा लाल रंगाचा असतो. खामगाव येथे केरन्ना आनंदे यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. आजरोजी खामगाव शहर व परिसरात शेकडो मंडळांकडून नवरात्रोत्सवानंतर हा शांती उत्सव भव्य प्रमाणात साजरा केल्या जात आहे.
VIDEO - राज्यात एकमेव लाल रंगाच्या देवी स्थापनेची परंपरा
By admin | Published: October 18, 2016 9:43 PM