बुलडाणा : पोलिस मुख्यालय बुलडाणा येथील कवायत मैदानावर पोलिस दिवाळी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस कर्मचाºयांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांमधून पोलिसांमधील सुप्त गुणांचे दर्शन घडले.यामध्ये प्रशासनाचे एकदिवसीय स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक शशीकुमार मिणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे, पोलीस उपअधीक्षक सी. टी. इंगळे तसेच जिल्ह्यतील पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलिस कवायत मैदानावर लावण्यात आलेल्या विविध वाहनांचे स्टॉल्स, मुलांचे खेळण्यांचे स्टॉल्सची पाहणी पोलीस अधीक्षकांनी केली. तब्बल पाच तास श्रवणसौख्याचा खजिना उधळणाºया पोलिस कर्मचाºयांमधील सुप्त गुणांचे विराट दर्शन घडविणाºया पोलिस कौटुंबिक मेळा पार पडला. मेळाव्या यशस्वीतेसाठी सायबर पोलीस स्टेशनचे बुलडाणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सचिन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मिलिंदकुमार दवणे, ज्ञानेश नागरे, पोलीस नाईक राजू आडवे, अमोल तरमळे, योगेश सरोदे, संजय भुजबळ, पंकज गिते, सतीष मुळे, प्रशांत चौथे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन अजिम नवाज राही यांनी केले.
दिवाळी मेळाव्यातून घडले पोलिसांमधील सुप्त गुणांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:29 PM
पोलिस मुख्यालय बुलडाणा येथील कवायत मैदानावर पोलिस दिवाळी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस कर्मचाºयांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांमधून पोलिसांमधील सुप्त गुणांचे दर्शन घडले.
ठळक मुद्देएकदिवसीय पोलिस स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन