बुलडाणा: शाळकरी मुलांची वाहतूक करणार्या बस मालकांनी उच्च न्यायालयाच्या, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आपल्या वाहनांची तपासणी करणे बंधनकारक आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करण्यासाठी नोंद झालेल्या स्कूल बस वाहन चालकांनी आपली वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अथवा शिबिर कार्यालयाच्या ठिकाणी आणावी व तपासणी करून घ्यावी. स्कूल बस मालकांनी आपले वाहन तपासणीसाठी सादर केले नाही, अशा स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येणार असून, याची नोंद घेण्यात यावी. जे स्कूल बस मालक बस तपासणी सुरक्षा विषयक तरतुदींचे पालन करणार नाहीत, तपासणीसाठी बस सादर करणार नाहीत, अशा बस मालकांच्या बसेस रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येतील. याबाबत बस मालकांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी कळविले आहे. जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यानंतर अनेक शाळेच्या बसची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंद घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसेसची तपासणी करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी बंधनकारक!
By admin | Published: May 09, 2017 1:45 AM