६ मे रोजी केवळ अमडापूर प्रा.केंद्रामध्ये १०० कोविशिल्डचे डोस उपलब्ध झाले आहे. याविषयी माहिती मिळताच ग्रामस्थांनी केंद्रावर गर्दी केली हाेती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने काेराेना संसर्ग हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे. लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याने ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. जिल्हा आरोग्य विभागामार्फत आतापर्यंत अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला अपुराच लस पुरवठा केला गेला आहे. दिवसेंदिवस लसीविषयी जनजागृती होत असल्याने लस घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यासाठी शासनाकडून ग्रामीण भागासाठी जास्तीत जास्त पुरवठा होणे आवश्यक आहे. लस पुरवठा जास्त प्रमाणात होत नसल्यामुळे मोजक्याच लोकांना लस मिळत आहे. त्यामुळे प्राथमिक आराेग्य केंद्रात मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे. ७ मे रोजी पासून १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य सहायक अनिल लोखंडे यांनी दिली आहे.
अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:36 AM