शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

खोलीकरणातून गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 3:16 PM

जळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांच्या चेहºयावर आनंद फुलला आहे. ४८ डिग्री तापमानात केलेल्या श्रमदानाचे फलीत झाले असा कृतार्थतेचा भाव या गावांमध्ये दिसून येत आहे. येत्या काही दिवसात वरुणराजाने साथ दिली तर ज्या गावामध्ये पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामे झाली ती गावे खºया अर्थाने पाणीदार होणार आहेत.जलगाव जामोद तालुक्यातील ५५ गावे तर संग्रामपूर तालुक्यातील ६० गावे यावर्षी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी अनुक्रमे ३५ व ३९ गावांनीच प्रत्यक्ष काम सुरु केले. जळगाव तालुक्यात २० गावांनी चांगले काम केले तर संग्रामपूरमध्ये सक्रिय राहणारी १८ गावे होती. त्यामध्ये चांगेफळ बु., उमरा पानाचे, सावळा, भीलखेड, पिंप्री कवठळ ही ५ गावे तालुकास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली. तर जळगाव तालुक्यातील बांडा पिंपळ, काजेगाव, निंभोरा बु. व निंभोरा खु. ही ४ गावे तालुकास्तरावर पात्र ठरली. यापैकी बांडा पिंपळ हे जळगाव तालुक्यातील आदिवासी गाव राज्यस्तरावरील १५ गावांमध्ये पात्र ठरले आहे.संग्रामपूर तालुक्यातील काकोडा, वानखेड, जस्तगाव, पंचाळा, वकाणा, काकणवाडा खुर्द, सालवन, सगोडा, एकलारा, सायखेड, पलसोडा, खळद बु., वरवट बकाल, नेकनामपूर, आलेवाडी, बावनबीर, अकोली, दुर्गादैत्य व धामणगाव या गावांनी पाणी फाऊंडेशनचे चांगले काम केले. जळगाव तालुक्यात पळसखेड, सुनगाव, जामोद, आसलगाव, सुलज, पळशी सुपो, हाशमपूर (वडगाव), हनवतखेड, राजुरा खुर्द, खांडवी, टाकळी खाती, पाटण (वडगाव), वडगाव पाटण या गावांनी सक्रिय राहत चांगले श्रमदान करीत व मशीनकाम करुन घेतले. जिल्हा समन्वयक प्रताप मारोडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव तालुका समन्वयक ऋषिकेश ढोले, राहुल शिरसाट, वैभव गावंडे व संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, सीमा उमाळे, गजानन ढोबाळे यांनी विशेष परिश्रम घेवून गावकऱ्यांना योग्य सूचना दिल्या. यातून गावे पाणीदार होण्यास मदत होत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट कामयावर्षी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या कालावधीत नेमकी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली होती. त्यामुळे बहुतांश अधिकारी वर्ग या कामात व्यस्त होता. तसेच राजकीय क्षेत्रात वावरणारी नेतेमंडळी सुध्दा या निवडणुकीत कामात गुंतली असल्याने त्यांचे अपेक्षित सहकार्य पाणी फाऊंडेशनच्या कामाला मिळू शकले नाही असे असूनही गावकºयांनी मात्र आपली जिद्द कमी होवू दिली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या कामांचा गाजावाजा कमी झाला परंतु प्रत्यक्ष काम मात्र दुपटीने झाले. संग्रामपूर तालुक्यात श्रमदानाने ३५ हजार घनमीटर पेक्षा जास्त काम झाले. तर मशीनद्वारे साडेचार लाख ते पाच लाख घनमीटर काम झाले. जळगाव तालुक्यात श्रमदानाने सुमारे ९० हजार घनमीटरपेक्षा जास्त काम झाले तर मशीनद्वारे सुमारे ५ लाख घनमीटरची सीमा ओलांडली आहे.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकSangrampurसंग्रामपूरJalyukt Shivarजलयुक्त शिवार